इ-मेल:

mss_mulund@rediffmail.com

संपर्क क्र.

+88794 32328

सुनीता म. देवधर ग्रंथालय

पुस्तकांची आपल्या जीवनामध्ये एक महत्वपूर्ण भूमिका असते. पुस्तके वाचनाने मनोरंजखेरीज नवीन विषयांची माहिती मिळणे, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन मिळणे व माहितीपूर्ण समाज घडणे यास मदत होते. ऐरोलीकारांसाठी ज्ञान मिळविण्याची व माहितीच्या शोधासाठी एक अत्यंत महत्वाची सार्वजनिक सेवा उपलब्ध करून देण्याचा उद्देश्याने स्थापन केलेल्या सुनीता म. देवधर ग्रंथालयाने सेवेची २२ वर्षे पूर्ण केली असून ते वाचकांची उत्तम सेवा करत आहे. विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके, सोयीची वेळ, प्रशिक्षित मनुष्यबळ, गुणवत्तापूर्ण सेवा,संगणकीकृत प्रणाली ही ग्रंथालायची वैशिष्टे असून पुस्तकांच्या माध्यमातून समृद्ध
समाज घडविण्याचा ग्रंथालय प्रयत्न करीत आहे.

विभागातर्फे सादर करण्यात आलेले काही उल्लेखनीय कार्यक्रम:

साहित्य यात्रा या वाचकप्रिय संस्थेद्वारे वेगवेगळ्या प्रकाशकांच्या पुस्तकांचे पुस्तक प्रदर्शन या दरम्यान प्रसिद्ध लेखक व अर्थतज्ञ श्री. जयराज साळगावकर यांचे बिटकॉईन या आभासी चलनावरील पुस्तकावर व्याख्यान

सुप्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार आणि प्राध्यापक प्रवीण दवणे यांचा साहित्य,संगीत आणि मानवी मूल्यांवर आधारित रंजक व प्रबोधनपर कार्यक्रम – “दिलखुलास”

भारतीय संगीताचा भावनिक, मानसिक ताणतणाव आणि शारीरिक व्याधी ह्यासाठी उपचारपद्धती म्हणून कसा उपयोग होतो हे विशद करणारे संगीतोपचार ह्या विषयावर व्याख्यान. – प्रमाणित संगीतोपचार तज्ञ सौ. मनीषा आपटे