महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, ऐरोली शाखेत नोव्हेंबर २००४ मध्ये खास महिलांसाठी मैत्री विभागाची स्थापना करण्यात आली. या विभागातर्फे होणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप – वेगवेगळ्या विषयांची व्याखाने, प्रेरणादायी पुरस्कार देणे, विविध कलागुणांची शिकवण देणार्या कार्यशाळा, लहान मुलांसाठी संस्कार शिबीर, प्रेरणादायी व विविध विषयांच्या मुलाखती, ग्राहक पेठ आणि महिलांसाठी विविध स्पर्धा अशा प्रकारचे आहे. प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी सायंकाळी ४ ते ६ य वेळेत मैत्रीचे हे कार्यक्रम अव्याहतपणे उत्साहाने चालू आहेत.
मैत्रीचा उद्देश विविध स्तरातील स्त्रियांचे सामाजिक, वैचारिक, आर्थिक राजकीय आरोग्य याचे प्रबोधन करून त्यांना आपल्या कला गुणांच्या अभिव्यक्ती साठी त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे हा आहे.