इ-मेल:

mss_mulund@rediffmail.com

संपर्क क्र.

+88794 32328

मुलुंड सभागृहाची माहिती

सु. ल. गद्रे सभागृह

५०’ x ९०’ x २०’ उंच सभागृह + ५०’ x ३५’ मंच + १२५’ लांब व्हरांडा + १००० स्क्वे. फूट मुख्य लॉबी.
बंदिस्त कपाट व स्वच्छतागृहासहित स्वतंत्र २ खोल्या
संपूर्णपणे वातानुकूलित
एका वेळी ४५० ते ५०० खुर्च्यांची व्यवस्था

सभागृह क्रमांक २

६०’ x १२०’ प्रशस्त, अच्छादित आणि सुशोभित मंडप
स्वतंत्रस्वच्छतागृहे
मुख्य सभागृहाशी जिना व लिफ्टने जोडलेले, तरीही स्वतंत्र
एका वेळी २००-२५० लोकांची भोजनाची सोय

सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह

दुसऱ्या मजल्यावरील सुमारे १५० लोकांची व्यवस्था असलेले सभागृह.
८०० स्क्वे. फूटाचा मुख्य भाग + कपडेपटाची खोली + स्वतंत्र स्वच्छतागृहे + खानपान सेवेसाठी अतिरिक्त जागा.
संपूर्ण वातानुकूलित.

मंगल कार्यालय / सभागृहांसंबधित विविध सुविधा

सभागृहाची पूर्ण वेळ व सत्रवार नोंदणी कार्यासाठी एक वर्ष अगोदर करता येईल. इतर कार्यक्रमासाठी चार किंवा कमी तासांसाठी ही नोंदणी दोन महिने अगोदर करता येईल. लग्न किंवा मुंजीसाठी कमीत कमी एक सत्राची नोंदणी आवश्यक आहे.

वेळ : पूर्ण दिवस – सकाळी ७.३० ते रात्री १०.००
अर्धा दिवस – सकाळी ७.३० ते दुपारी ३.००,
अर्धा दिवस – दुपारी ४.०० ते रात्री. १०.००
भाडे
अनामत
पूर्ण दिवसअर्धा दिवस
    
सु. ल. गद्रे सभागृह५०,०००/-३५,०००/-१५,०००/-
Food Court२५,०००/-१५,०००/-१५,०००/-
सु. ल. गद्रे सभागृह आणि Food Court७५,०००/-५०,०००/-२०,०००/-
    
सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह१५,०००/-१०,०००/-१०,०००/-
    
४.०० तासांसाठी   
    
सु. ल. गद्रे सभागृह २५,०००/-१०,०००/-
Food Court १०,०००/-१०,०००/-
सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह ८,०००/-१०,०००/-
    


१) सभागृहाची नोंदणी १२ महिने आगाऊ करता येईल. ( पूर्ण किंवा अर्ध्या दिवसासाठी )
२) सभागृहाची नोंदणी करतेवेळी भाडे व अनामत रक्कम अशी एकूण सर्व रक्कम धनादेशद्वारे वा रोखीने भरावी लागेल.नोंदणी करतेवेळी वधु आणि वराची पूर्ण नावे पत्त्यासमवेत द्यावीत.
३) सभागृह जादा वापरल्यास प्रत्येक तासाला रु. ५,०००/- आकार भरावा लागेल. सत्रवार नोंदणीसाठी सदर जादा तासांची सुविधा पुढील नोंदणीवर अवलंबून असेल.
४) सभागृहाच्या भाड्यात स्टेजसह रिकामा हॉल , वधूपक्षासाठी व वरपक्षासाठी प्रत्येकी एक वातानुकुलीत खोली, स्वयंपाकगृह, पाणी, वीज, लिफ्ट व जनरेटर या सुविधा मिळतील. जनरेटरची सुविधा रात्रौ १०.०० नंतर मिळणार नाही.
५) दोन दिवस बुकिंग असल्यास रात्री वधु- वर खोल्यासाठी भाडे प्रत्येकी रु. ४,०००/- व रात्री हॉल हवा असल्यास भाडे रु. २०,०००/- असेल त्यात ए. सी. ची सुविधा मिळेल.
६) वेळोवेळी अंमलात असणारे सर्व सरकारी व संस्थेचे नियम सभागृह वापरणाऱ्या ग्राहकांवर बंधनकारक राहतील.
७) सभागृहामध्ये सनई-चौघड्या व्यतिरिक्त अन्य वाद्यवादन , बँड , मद्यपान, मांसाहार याला मनाई आहे.
८) अनामत रक्कम साधारणपणे कार्य झाल्यानंतर १० दिवसांनी धनादेशाद्वारे परत दिली जाईल. ( धनादेश सभागृह आरक्षित करणाऱ्या व्यक्तीच्या नावे दिला जाईल.) अनामत रक्कम परत करतेवेळी कार्याच्या दिवशी लागू असलेल्या दराने वस्तू व सेवा कर (GST ) सध्याचा दर १८ टक्के आहे. व इतर देय रक्कम कापून अनामत परत केली जाईल.
९) वातानुकूलन यंत्रणा, जनरेटर व लिफ्ट कुठल्याही कारणाने बंद पडल्यास होणाऱ्या गैरसोयीस संस्था जबाबदार नाही.
१०) जनरेटरवर आवश्यक प्रकाशयोजना आणि २५ टक्के वातानुकूलन यंत्रणा उपलब्ध होईल व लिफ्ट बंद असेल.
११) वधु किंवा वराच्या कुटुंबात कार्याच्या आधी मृत्यूची एखादी दु:खद घटना घडली असेल तर मृत्यू प्रमाणपत्र दाखल केल्यास सर्व रक्कम परत मिळेल. ( कुटुंबाची व्याख्या: आई- वडील- , आजी- आजोबा आणि अपत्य) वरील कारणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणाने सभागृह आरक्षण रद्द केल्यास फक्त अनामत रक्कम परत मिळेल. जर त्या तारखेला सभागृह दुसऱ्या पार्टीने बुक केल्यास अनामत रक्कम पूर्ण व भाडे रक्कमेच्या ७५ टक्के रक्कम परत मिळेल. GST ची रक्कम परत केली जाणार नाही.
कृपया प्रतिष्ठित व्यक्तींचा / राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये.
१२) कार्याची तारीख बदलून घ्यावयाची असल्यास रु. ५,०००/- कार्यालयीन आकार घेण्यात येईल, याचा कालावधी १५ दिवसांचा असेल. कृपया याची नोंद घ्यावी.
१३) वलेट पार्किंगची सुविधा उपलब्ध ( अतिरिक्त दरासहित

संपर्क

हॉल बुकिंग फॉर्म

    संपर्क माहिती

    • आमचा पत्ता:

      महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड पं. जवाहरलाल नेहरू मार्ग, इंदिरा नगर, मुलुंड (प) मुंबई - ४०००८०

    • संपर्क क्र.:

      श्री. सतिश कामत 9930988575
      श्री. सिद्धार्थ कामत 8080777575

    • इ-मेल:

      info@maharashtrasevasangh.in