इ-मेल:

mss_mulund@rediffmail.com

संपर्क क्र.

+88794 32328

कला विभाग

कलाकारांच्या कला गुणांना वाव मिळावा व एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच रसिक प्रेक्षकांना मनोरंजन या कला विभागाची स्थापना सन – २००४ मध्ये करण्यात आली. त्या अंतर्गत उल्लेखनीय कार्यक्रम आयोजिले केले. विभागातर्फे आजवर अनेक एकांकिका सादर करण्यात आल्या. त्यातील काही मोजक्या एकांकिकेचे उल्लेख खालील प्रमाणे :-

एकांकिका : विच्छा माझी पुरी करा (वग नाट्य)
दिग्दर्शक : प्रवीण नार्वेकर
सदर एकांकिका मुख्यत्वे एक राजा आणि त्याची इच्छा (विच्छा) पूर्ण करू इच्छिणाऱ्या एका हवालदार / नाईकाच्या भोवती फिरते. अतिशय उपरोधिक आणि विनोदी शैलीत हे नाटक राजकीय परिस्थिती, सामाजिक समस्या आणि भ्रष्टाचारावर मार्मिक भाष्य करते.

एकांकिका : अध्याहृत
लेखन : अंजली पेंढरकर
दिग्दर्शक : किशोर पेंढरकर
स्त्रियांचे कर्तुत्व, त्याचे हक्क, स्वात्यंत्र, बदलत्या वातावरणामुळे मनाच्या रुंदावलेल्या कक्षा व त्याची गळचेपी करू शकणारा पुरुषी अहंकार या संघर्षाचे प्रगल्भ चित्रीकरण करणारी एकांकिका. या एकांकीकेने अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत.

एकांकिका : दरवेशी
लेखन : संतोष पवार
दिग्दर्शक : किशोर पेंढरकर
या एकांकिकेची खासियत म्हणजे कामगार आणि मालक यांच्यातील संघर्ष व त्यांचे एकमेकांवरील अवलंबनत्व हे अस्वल आणि दरवेशी यांच्या खेळातून सादर करण्यात आले.

एकांकिका : हुतुतू
लेखक : सतीश आळेकर
दिग्दर्शक : किशोर पेंढरकर
या एकांकिकेत दोन पिढ्यांतील संघर्ष वेगळ्या पद्धतीने दाखविण्यात आला.

एकांकिका : I M पुंगळ्या आगीमहुळ
लेखक / दिग्दर्शक : प्रशांत निगडे.
प्रशांत निगाडे यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेले हे नाटक १४ महाराष्ट्र राज्य पुरस्कारांचे मानकरी ठरले आहे. हे नाटक पारधी समाजाचा ऐतिहासिक आणि सध्या सुरू असलेला संघर्ष मांडण्यासोबतच प्रेम, बंडखोरी आणि माणुसकी यांसारख्या विषयांवर प्रकाश टाकते. मी पुंगळ्या शाहरुख्या आगीमाहूळ हे अत्यंत प्रशंसित आणि पुरस्कारप्राप्त असे मराठी
प्रायोगिक नाटक आहे. हे नाटक भारतातील पारधी (शिकारी) जमातीची हृदयस्पर्शी आणि रोमांचक कथा मांडते ; यात पुंगळ्या नावाच्या अशा एका व्यक्तीचा संघर्ष रेखाटला आहे, जो कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय केवळ जगण्यासाठी आणि अस्तित्वासाठी धडपडत असतो.

एकपात्री अभिनय स्पर्धा

विभागातर्फे सलग ११ वर्षे एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या यात अनेक स्पर्धकांनी भाग घेतला असून उदय सबनीस, अरुण अत्रे, संजय तोडणकर, संदीप जंगम, अशोक पालवे अश्या अनेक मान्यवरांनी स्पर्धेचे परीक्षण केले. तसेच आज रंगभूमी गाजवणारे अभिजित झुंझारराव, आदित्य हळबे असे अनेक कलाकार स्पर्धक म्हणून लाभले.

अभिवाचन

संस्थेतर्फे अनेक अभिवाचन स्पर्धांमध्ये भाग घेऊन संस्थेला अनेक पारितोषिके प्राप्त करून देण्यात आली. डॉ. महेश केळुसकर लिखित क्रमशः कादंबरी, प्रसिद्ध साहित्यिक रत्नाकर मतकरी रहस्यमय आणि भयपूर्ण लघुकथांचा संग्रह – खेकडा, अंजली पेंढरकर लिखित शुभ मंगल सावधान अश्या अनेक सादरीकरणांना पारितोषिके मिळाली. त्याच बरोबर काही संस्थांमध्ये विविध सादरीकरण करण्यात आली.

मुंगी उडाली आकाशी

लेखन : पद्माकर गोवईकर
संकल्पना – दिग्दर्शन : संदिप जंगम
संत ज्ञानदेव, सोपान आणि निवृत्तीनाथ या तीन भावंडांची एकुलती एक बहीण मुक्ताबाई ही तितकीच प्रतिभावान संपन्न आणि असामान्य व्यक्तिमत्त्वाची होती. श्रीयुत गोवारीकर यांनी ‘मुंगी उडाली आकाशी’ कादंबरी द्वारे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे. या कादंबरीचे अभिवाचन ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’ ऐरोली शाखेद्वारे प्रस्तुत करण्यात आले
रारीकांनी या कार्यक्रमाचा चांगला आस्वाद घेतला.

पोलिस पोलिस (दीर्घांक अभिवाचन)

दिग्दर्शन : संजीव सत्यविजय धुरी

हा दीर्घांक प्रामुख्याने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे जीवन, त्यांच्या ड्युटीचे ताणतणाव, कौटुंबिक
आघाड्यांवरील त्यांचे संघर्ष आणि कर्तव्य बजावताना त्यांना येणारे सामाजिक अनुभव यावर प्रकाश
टाकतो. हा पूर्ण रंगमंचीय नाटकाऐवजी एक अभिवाचन प्रयोग आहे. यात संवादांचे सादरीकरण,
आवाजातील चढ-उतार आणि भावनिक अभिव्यक्ती यावर जास्त भर दिला जातो. संजीव धुरी यांनी या
दीर्घांकाचे अत्यंत प्रभावी दिग्दर्शन केले आहे, जे प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

प्रभात चित्र मंडळ

प्रभात चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याला एक राष्ट्रीय, व विविध स्पर्धांमधील पारितोषिक
प्राप्त चित्रपट दाखविण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. त्यातील काही दाखविण्यात आलेल्या उत्कृष्ट
चित्रपटांची नावे खालील प्रमाणे –
मधुमती, लाखाची गोष्ट, एक होता विदुषक, मुक्ता, ध्यासपर्व, आक्रीत, दोघी, कोरस, द ब्लू अम्ब्रेला,
सुजाता, कासव तसेच लघु चित्रपटांमध्ये – मयत, पारो, गोल्डन टॉयलेट, Pesum Por Chithiirme –
तमिळ, Pullanji – मल्याळम , Marilyn Lights – हिंदी, Ticket – बंगाली, भारत, लव्हाल, मंगल, सावज,
गुप्तधन, फोन युग.

चित्रपट – मुलाखत

नाट्य, चित्रवाणी आणि चित्रपट या माध्यमांतून आपल्या समर्थ अभिनयाने घराघरांत पोहोचलेल्या
अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर या जोडीने गाजविलेला चॅम्पियन्स हा चित्रपट एक आकर्षण ठरला.
सुप्रसिद्ध अभिनेते उदय सबनीस यांनी या चित्रपटाच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधला या चित्रपटात
काम करणारे लिटिल चॅम्पियन्स देखील या कार्यक्रमात सहभागी होते.
मुलाखत – चित्रपट – चॅम्पियन
पाहुणे : नाट्य चित्रपट कलाकार – अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, उदय सबनीस

प्रगट मुलाखत

pragat-mulakhat

मराठी – हिंदी, नाटक – चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते व मानसोपचार तज्ञ – श्री.मोहन आगाशे यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली.

वरील नमूद केलेल्या विविध साहित्यिक कलात्मक विषयांव्यतिरिक्त वेगवेगळ्या सामाजिक विषयांना हाताळणारे उदा. मृत्युपत्राचे महत्त्व, महिला विषयक, सहकारी धोरण, आर्थिक विषयांशी निगडीत अर्थ संकल्प / अर्थव्यवस्थेवर कार्यक्रम सुप्रसिद्ध अर्थतज्ञ – चंद्रशेखर टिळक, अभिजित फडणीस, सुनीती नागपूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.