
यंदा आरोग्य विभाग पुनर्गठीत करण्यात आला. आरोग्य विभागाने मुख्यता शरीर स्वास्थ्यवर भर देण्याचे ठरविले आहें. विविध उपक्रम राबवून त्या मधून जनजागृती निर्माण करणे हे आरोग्य विभागाचे मुख्य ध्येय आहें. म्हणूनच आरोग्य प्रबोधन व्याख्यानमाला सुरु केली. ह्या उपक्रमाला महाराष्ट्र टाईम्स हे मेडिया पार्टनर आहेत. बॉम्बे मेडिकल एड फौंडेशन च्या साहाय्याने मुलुंड येथील दवाखाना व भौतिक उपचार केंद्र उत्तम रित्या सुरू आहें.
आरोग्य प्रबोधन व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी झाले. ह्या पुष्पात डॉ आयुषी लोधा यांचे त्वचेची काळजी कशी घ्यावी ह्या विषयावर डॉ. नेहा पाटणकर ह्यांनी मुलाखत घेतली. ह्या मुलाखतीत डॉ. लोधा ह्यांनी तरुण आणि वृद्धांनी आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी तसेच त्यासाठीचा योग्य आहार ह्याचे संपूर्ण मार्गदर्शन केले. श्रोत्यांनी ह्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
दुसरे पुष्प २८ जानेवारी २०२६ रोजी झाले. ह्या पुष्पात एक अगदी वेगळा विषय निवडला होता. “ सोशल मेडिया वापर- फायदे आणि दुष्परिणाम “ डॉ. सुनीला डिंगणकर ह्यांनी सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे संवाद कमी होणे, भावनिक अंतर वाढणे आणि फसवणुकीचे प्रकार वाढणे यांसारख्या समस्यांवर या सत्रात चर्चा करण्यात आली. त्यांची मुलाखत डॉ. श्वेता देव जोग ह्यांनी घेतली. जरी विषय थोडा वेगळा होता तरीही श्रोत्यांचा उत्साह चांगलाच होता.
तिसरे पुष्प २८ फेब्रुवारी २०२६ रोजी झाले. ह्या भाषणासाठी सध्या मुंबई शहरामध्ये होणारे प्रदुषणं हा ज्वलंत विषय घेतला. “ प्रदूषण आणि श्वसनरोग “ ह्या विषयावर डॉ. तरंग कुलकर्णी ह्यांना बोलते केले डॉ. नितीन पाटणकर ह्यांनी. वाढत्या प्रदूषणामुळे होणारे श्वसनाचे आजार, त्यांची कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय तसेच घरगुती धूर, स्मॉग आणि त्यापासून बचावाचे उपाय यावरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. एकूणच, हा कार्यक्रम आरोग्याविषयी जागरूकता वाढवणारा आणि अत्यंत उपयुक्त ठरला.
15 मार्च २०२६ रोजी मोफत “नेत्र तपासणी” शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरामध्ये “रामकृष्ण नेत्रालय” यांच्या तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली आणि आवश्यक ते मार्गदर्शन दिले गेले. ह्या शिबिराचा ६५ नागरिकांनी लाभ करून घेतला.
चवथे पुष्प २८ मार्च २०२६ रोजी झाले. “संभ्रमाच्या जाळ्यातून बाहेर पडूया” या विषयावर डॉ. मंजिरी घरत ह्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात जेनेरिक औषधांबाबतचे गैरसमज, औषधांची गुणवत्ता, किंमत व योग्य वापर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तज्ञ डॉक्टरांनी औषधांविषयी जागरूकता वाढवून योग्य निर्णय घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. हा कार्यक्रम प्रत्यक्ष तसेच ऑनलाईन माध्यमातूनही उपलब्ध करून देण्यात आला.
अध्यक्ष – Dr नितिन पाटणकर
कार्यवाह – श्री विजय वझे
सदस्य – श्री अरुण भंडारे, श्री प्रकाश सडेकर, श्री विनायक जोगळेकर, डॉ. श्वेता देव जोग, डॉ. नेहा पाटणकर, दीप्ती सौदागर,श्री राहुल मेश्राम, सौ नंदिनी हंबर्डे, श्रीमती मृदुला सौदागर, श्री विवेक भंडारे, श्री अतुल धारप.
आरोग्य विभागाने खलील महत्त्वाचे कार्यक्रम सादर केले:
1. 20-04-2014 – विषय- “सात चक्रावर ध्वनी आणि नाद”
2. 24-01-2016- विषय- “गर्भसंस्कार”
3. 28-07-2019- विषय- “अवयवदानाचे महत्व आणि फायदे” ह्या कार्यक्रमात अवयवदान आणि देहदान ह्या चळवळीची पूर्ण माहिती दिली आणि अवयवदानाचे लाभार्थी ह्यांच्या मुलाखती घेतल्या.
4. 03-08-2019-” प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन(PSA)” तपासणी शिबीर फॉर्टस हॉस्पिटल च्या सहकार्यांनी
5. 18-09-2019- “स्त्रियांसाठी वैद्यकीय चिकित्सा” शिबीर- फॉरटीस हॉस्पिटल च्या सहकार्यांनी
6. 30-11-2019- “आरोग्याचा मंत्र आणि संगीताचे तंत्र” अर्थात ” म्युझिकल मेडिकोज” अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात सर्व वैद्यक शास्त्रातील डॉक्टर्स ह्यांनी गाणी गायली
7. 09-03-2025- संधिवात तपासणी शिबीर डॉ गौरी ओक
8. आंतरराष्ट्रीय योग्य दिवसाचे जून महिन्यातले औचित्य साधून प्रत्येक वर्षी योगांवरचे कार्यक्रम आयोजित केले गेले.