इ-मेल:

mss_mulund@rediffmail.com

संपर्क क्र.

+88794 32328

अभ्यासिका

 

अनेकदा घरी अभ्यासासाठी योग्य वातावरण नसते किंवा सतत व्यत्यय येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना शांत व एकाग्र वातावरणात अभ्यास करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देश्याने २२ वर्षांपूर्वी अभ्यासिकेची स्थापना करण्यात आली. उच्च शिक्षण घेणारे विविध अभ्यासक्रमांचे विद्यार्थी तसेच बढतीसाठी प्रयत्न करणारे अनेक आस्थापनांमधील कर्मचारी या अभ्यासिकेचा लाभ घेत असून आतापर्यंत सुमारे १०,००० विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घेतला आहे.

 

विभागातर्फे सादर करण्यात आलेले काही उल्लेखनीय कार्यक्रम:

  • प्राणायाम योगासने आणि ध्यान यामुळे शरीराचे स्वास्थ तर उत्तम राहते पण मनही आनंदी आणि स्थिर राहते २१ जून या आंतरराष्ट्रीय योगादिनानिमित्त प्रात्याक्षिके आणि मार्गदर्शन शिबीर – योगशिक्षक डॉ. उमेश कपूर.
  • दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थांसाठी त्यांची आवड, क्षमता, बाजारातील मागणी आणि भविष्यातील संधी यावर करिअर संबंधी मार्गदर्शनपर व्याख्यान – सौ. शैलेजा मुळे . तसेच सैन्यदलातील करिअर संबंधी विशेष मार्गदर्शनपर व्याख्यान – मेजर (निवृत्त) श्री. सुभाष गावंड.
  • प्रशासकीय सेवा परीक्षांसंबंधी विशेष मार्गदर्शन – श्री. संजय मोरे .