इ-मेल:

mss_mulund@rediffmail.com

संपर्क क्र.

+88794 32328

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, ऐरोली शाखा

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, ऐरोली शाखेच्या बांधकामाचा शुभारंभ दि. ०९ फेब्रुवारी २००० रोजी झाला असून सदर वास्तू चे उद्घाटन २६ मार्च २००१ रोजी झाले. सामाजिक, सांस्कृतिक तसेच स्त्रियांकरिता विविध कार्यक्रम संस्था, विविध विभागाच्या मार्फत सादर करत असते. संस्थेअंतर्गत होणाऱ्या वर्धापन दिन आणि दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे औचित्य साधून संगीत क्षेत्रातील विविध नामवंत संगीतकार, जेष्ठ गायक, गायिका यांवर आधारित संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

विश्वस्त

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड

पदाधिकारी

महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड

कार्यकारिणी सदस्य

diwali-pahat

दिवाळी पहाट – आकाशवाणी मुंबई केंद्र
प्रभाकर कारेकर, रामदास कामत, मंगला जोशी व मंजुषा पाटील अश्या नामवंत कलाकारांनी आळविलेले भारावून टाकणारे नाट्य गीतांचे स्वर. आकाशवाणी निर्मित असलेला हा कार्यक्रम ऐरोली शाखेत सादर होत असताना त्याचे संपूर्ण महाराष्ट्रभर थेट प्रक्षेपण करण्यात आले.

वर्धापन दिन

गायिका – श्रीमती. आरती अंकलीकर-टिकेकर

वर्धापन दिनानिमित्त पूर्णपणे शास्त्रीय गाण्यावर आधारित असलेला हा कार्यक्रम सौ. आरती अंकलीकर – टिकेकर यांनी सादर केला. लोकांची बदलती आवड व विविध दुरदर्शन वाहिन्यावरून सुरु असलेल्या नवसंगीताचा धडाका असूनही श्रोत्यांचा या कार्यक्रमाला उत्सुर्त प्रतिसाद लाभला.

vardhapan-din
vardhapan-din1

गायिका – श्रीमती. मंजुषा कुलकर्णी – पाटील.

अभिजात संगीतातील रसिले व्यक्तीमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे अश्या मंजुषा कुलकर्णी – पाटील यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

शिक्षक पुरस्कार

प्रतिवर्षी महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा या कार्यक्रमाकरिता ऐरोली मधील शाळांतील जेष्ठ शिक्षकांचा सत्कार व शालान्त उच्च माध्यमिक परिक्षांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार करते.

मुंबई ग्राहक पंचायत

मुंबई ग्राहक पंचायत – वर्षपूर्ती महारेराची होईल का इच्छापूर्ती ग्राहकांची.
पाहुणे : महारेरा अध्यक्ष – श्री.गौतम चटर्जी
मुंबई ग्राहक पंचायत कार्याध्यक्ष – शिरीष देशपांडे

महाराष्ट्रामधील रेराचे अध्यक्ष, श्री. गौतम चॅटर्जी तसेच मुंबई ग्राहक पंचायत कार्याध्यक्ष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई ग्राहक पंचायत यांच्यावतीने एक कार्यक्रम सादर करण्यात आला कार्यक्रमात ग्राहकांनी आपल्या अडचणी सांगितल्या व त्या वरूनच सर्वसामान्य ग्राहक किती नडला गेला याची सर्व प्रेक्षकांना जाणीव झाली व एक अतिशय समाजाला भेडसावणाऱ्या प्रश्नाला या
कार्यक्रमाद्वारे वाचा फोडण्यात आली. याबद्दल महाराष्ट्र सेवा संघ व मुंबई ग्राहक पंचायत यांचे उपस्थितीत प्रेक्षकांनी आभार मानले.

इमारत पुनर्विकास संदर्भात मार्गदर्शन पर कार्यशाळा

सध्या घर घरात गल्लीबोळात तसेच सिनिअर सिटीझन कट्ट्यावर व प्रत्येक सोसायटीत, सोसायटी पदाधिकारी, बगिचात सर्वत्र पुनर्विकासासंदर्भात चर्चा ऐकू येते व रहिवासी वेगवेगळ्या माधमातून पुनर्विकासासंदर्भातील विविध बाबींवर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत असतात. समाजाला
भेडसावणाऱ्या या प्रश्नावर मार्गदर्शन करण्यासाठी समाजसेवी संस्था या नात्याने नवी मुंबई हाउसिंग फेडरेशन लिमिटेड व महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, ऐरोली शाखा या संस्थांनी मिळून संयुक्त विद्यामाने वरील विषयासंदर्भात एका कार्यशाळेचे आयोजन केले.

पाहुणे : जेष्ठ वास्तुविशारत (AR) श्री. कौस्तुभ कुर्लेकर, अॅडव्होकेट श्री.प्रसाद परब, E.A.Patil Associate
LLP. Vashi यांचे CEO, CA श्री.उज्ज्वल लांडगे, वरिष्ठ भागीदार CA श्री.समीर गवळी व CA श्री. संतोष
धुमाळ , श्री. भास्कर म्हात्रे (नवी मुंबई हाउसिंग फेडरेशन लिमिटेड चे कार्यवाह)

सहकारी गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन व 79A मधील तरतुदी या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा

व्यवस्थापन समिती सभासद संख्या, त्यांची निवड, लेखा परीक्षण, संस्थेच्या कार्यवाहीच्या नियमावली, गृहनिर्माण सभासदत्वाची नियमावली इत्यादी गोष्टींविषयी व्यवस्थापन समितीला अनेक शंका असतात. पुनर्विकासामुळे अत्यंत जिव्हाळ जिव्हाळ्याचा बनलेला 79A यातील मार्गदर्शक तत्वे या सर्वांविषयी नवी मुंबई
हाउसिंग फेडरेशन लिमिटेड चे कार्यवाह – श्री. भास्कर म्हात्र यांनी मार्गदर्शन केले.