इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com
२०.११.१९३७ रोजी “महाराष्ट्र सेवा संघ” असा नामबदल. सुरुवातीची वर्गणी – फक्त चार आणे प्रतिमास. सुरुवातीची उद्दिष्ट्ये – धार्मिक उत्सव करणे, लोकांच्या अडचणी दूर करणे, प्रत्येकास मदत करणे व सर्वांनी एक होणे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, कोजागिरी साजरी करायला सुरुवात. व्यायामशाळा सुरु. श्रमदानाने नानेपाड्याचा रस्ता बांधला. गावात मानाचे स्थान मिळाले. ऑगस्ट १९४० मध्ये कै. गणेश गावडे ह्यांच्या प्रयत्नाने २४०० चौ. वारांची जागा संस्थेला प्राप्त.
दि. १६ जाने. १९५५ ह्या दिवशी तत्कालीन महसूल मंत्री ना. भाऊसाहेब हिरे ह्यांच्या हस्ते वास्तूचे कोनशिला पूजन. ह्या निमित्ताने “मराठी भाषिक संमेलन आयोजित”.
ठाण्याचे वास्तूविशारद श्री. डी. डी. काळे ह्यांनी स्वखर्चाने वास्तू उभी केली. नंतर संस्थेकडून रकमेचा परतावा. १९५९ मध्ये सदर वास्तू (महाराष्ट्र भवन) बांधून तयार. नवीन वास्तूत व्यायामशाळेची सुरुवात. डॉ. पुरंदरे ह्यांची वास्तूसाठी भरीव आर्थिक मदत. सॉलीसिटर पंडित पती-पत्नी ह्यांनी संस्थेच्या वास्तूच्या रस्त्यासाठी स्वतःची गणेश बाग नावाची जागा दिली.
महाराष्ट्र भवनात संस्थेच्या कार्याला सुरुवात. शिवाय वास्तूत दुकाने सुरु. सार्वजनिक शिक्षण संस्थेने शाळेसाठी संस्थेची जागा भाड्याने घेतली व १९६१ पासून पुरंदरे हायस्कूल संस्थेच्या वास्तूत सुरु झाले. “रोटरी क्लब’ ऑफ मुलुंडच्या सभा सुरु.
१९६२ साली तत्कालीन कायदेमंत्री मा. हरिभाऊ गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचा रौप्यमहोत्सव साजरा. १९६९ साली कै. राम गणेश गडकरी यांची ५० वी पुण्यतिथी जोरात साजरी. आठवडाभर सोहळा संपन्न. तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन. तत्कालीन अध्यक्ष श्री. सु. ल. गद्रे यांचा पुढाकार. १९७५ साली विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन वस्तूचे भूमीपूजन सेवाव्रती वि. स. बापट यांच्या शुभहस्ते संपन्न.
अनेक लोकांच्या भेटी, देणग्या ह्यातून नवीन वास्तू संपन्न. २३.१०.१९७७ रोजी विजयादशमीला इतिहासज्ञ पद्मश्री श्री. सेतुमाधवराव पगडी यांच्या हस्ते आजच्या वास्तूचे उद्घाटन. युनायटेड वेस्टर्न बँक व अपना बाजार यांचे मोलाचे सहकार्य. वास्तूचे त्या काळातले मूल्य रु. १४ लाख.
संस्थेच्या गौरवपूर्ण कार्यामुळे सिडकोतर्फे संस्थेला ऐरोली, नवी मुंबई येथे सवलतीच्या दरात भूखंड प्रदान. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक श्री. दत्ताजी ताम्हाणे आणि सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष श्री. नारायण मराठे यांच्या उपस्थितीत ऐरोली वास्तूचे भूमीपूजन संपन्न. संस्थेचे विश्वस्त श्री. म. बा. देवधर यांनी दिलेली रु. २५ लाखाची देणगी, अन्य हितचिंतकांनी दिलेल्या देणग्या व युनायटेड वेस्टर्न बँकेने केलेल्या सहकार्यातून सव्वा कोटी रुपयांची वास्तू दोन वर्षात पूर्ण. दि. २६.०३.२००१ ला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष श्री. प्र. ना. जोशी यांच्या हस्ते वास्तूचे उद्घाटन. ऐरोली शाखेत ग्रंथालय, मैत्री विभाग तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सुरु. “कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” ह्या संस्थेच्या बोधवाक्याला अनुसरून संस्थेतर्फे सादर होणाऱ्या बहुतेक सर्वच कार्यक्रमांसाठी सर्व नागरिकांना विनामूल्य प्रवेश असतो हे जरूर नमूद करावेसे वाटते.
महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड
श्री. अजित करंदीकर पूर्व अधिवक्ता, मुंबई उच्च न्यायालय व विकासक, संचालक- वास्तव ग्रुप
View Profile
श्री. चंद्रशेखर नारायण वझे बी.कॉम. सीए, सी एस , एल एल बी अध्यक्ष – महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (पश्चिम) अध्यक्ष – संस्कृत भारती (पश्चिम क्षेत्र )(कोकण, गोवा, गुजरात, सौराष्ट ) ...
View Profile
श्री. किरण रामचंद्र देशमुख इलेक्ट्रिकल इंजिनियर, गेली ३८ वर्षे स्वतःचा इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टिंग चा व्यवसाय, मुंबई एअरपोर्ट सहित अनेक मोठ्या आस्थापनांना सेवा पुरवतो, सोबतच अनेक सामाजिक संस्थांमध्ये जबाबदारीने कार्यरत, गिर्यारोहण, संगीत, ...
View Profile
डॉ. आनंद कट्टी डॉ. आनंद कट्टी हे चार दशकांहून अधिक अध्यापन, संशोधन, सल्लागार सेवा व संस्थात्मक नेतृत्वाचा समृद्ध अनुभव असलेले स्थापत्य अभियंता व शिक्षणतज्ज्ञ आहेत. ते NHITM ठाणे येथे प्राध्यापक ...
View Profileमहाराष्ट्र सेवा संघ मुलुंड
श्री. चंद्रशेखर नारायण वझे बी.कॉम. सीए, सी एस , एल एल बी अध्यक्ष – महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड (पश्चिम) अध्यक्ष – संस्कृत भारती (पश्चिम क्षेत्र )(कोकण, गोवा, गुजरात, सौराष्ट ) ...
View Profile
सतीश श्रीधर पाटणकर उपाध्यक्ष शिक्षण: एम. टेक. (आय आय टी मुंबई) व्यवसाय: संरचना अभियंता विशेष रुची: साहित्य, संगीत, योगाभ्यास काही सामाजिक संस्थांमध्ये सक्रीय सहभाग
View Profile
श्री. जयप्रकाश बर्वे IDBI बँकेतून सेवानिवृत्त, गेल्या ४५ वर्षां पासून महाराष्ट्र सेवा संघाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग. २० वर्षे कोषाध्यक्ष, १० वर्षे कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्य केले असून, सन २०१५ ...
View Profile
श्री. गुरुप्रसाद वसंत कार्लेकर एअर इंडिया मधून अभियंता म्हणून निवृत्त. महाराष्ट्र सेवा संघातून संस्कृत नाटकात अनेक वर्षे सहभाग
View Profile
श्री. धनंजय दिनकर दिवेकर. कोषाध्यक्ष. सभासद क्रमांक: ६९६ बीकॉम, चार्टर्ड अकाउंट छंद: मधमाशी पालन व संवर्धन, पोस्टची तिकिटे जमवणे, पक्षी फोटोग्राफी, ॲक्वेरिअम फिश पाळणे, बाग बगीचा लावणे. इत्यादी.
View Profile
श्री. प्रसाद सुरेश गोडसे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतून सहाय्यक अभियंता या पदावरून स्वेच्छानिवृत्त महाराष्ट्र सेवासंघाच्या संस्कृत विभागातर्फे राज्य नाट्य स्पर्धेत १९८९ पासून सहभाग.
View Profile
श्री. महेंद्र तेरेदेसाई चित्रपट, माहितीपट, नाटक, जाहिरात क्षेत्रात लेखक आणि दिग्दर्शक म्हणून गेली ३६ वर्ष कार्यरत. अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कारांच्या ज्युरी पॅनेलवर नेमणूक. काही शिक्षण संस्थांमध्ये चित्रपट लेखन आणि ...
View Profile
श्री. शंकर गोविंद वीरकर. ऐरोली शाखेमध्ये व्यवस्थापकीय समिती सदस्य म्हणून गेली 25 वर्षे कार्यरत. ग्रंथालय, अभ्यासिका,कलाविभाग या विभागांत काम,तसेच ऐरोली शाखा कार्यवाह म्हणून 9 वर्ष कार्यरत. शाखेतर्फे विशेष कामांसाठी नियुक्त ...
View Profile
श्री. राहुल सुदेश मेश्राम बी.ई. (EXTC) पदवीधर, मध्य रेल्वेच्या सिग्नल व दूरसंचार विभागात अभियंता म्हणून कार्यरत. महाराष्ट्र माऊंटेनियर्स रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर (MMRCC) चे समन्वयक, शोध व बचाव कार्यात सक्रिय योगदान. ...
View Profile
श्री किशोर मनोहर पेंढरकर महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा अध्यक्ष 🔸 म से सं ऐरोली कालविभाग अध्यक्ष म्हणून १५ वर्षे कार्य 🔸म से सं ऐरोली कोषाध्यक्ष म्हणून ५ वर्षे कार्य ...
View Profile
श्री. विजय वा. वझे 2006 साली भारत सरकारच्या वित्त विभागातून ग्रुप A अधिकारी पदावरून स्वेच्छा निवृत्ती. त्यानंतर महाराष्ट्र सेवा संघाशी जोडून घेतलं. ऑफिस आणि प्रायव्हेट क्लब मधून 25 वर्षे क्रिकेट ...
View Profile
All Rights Reserved by Maharashtra Seva Sangh Mulund 2026 - 27. Website Developed & Maintained By World Wide Web Pune
