इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com

यावर्षीच्या संस्कृत दिनानिमित्त, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड आणि संस्कृत भारती यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमद् आदिशंकराचार्य यांच्या काही स्तोत्रांची पाठांतर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पाठांतरासाठी निवडलेल्या स्तोत्रांची पीडीएफ सोबत जोडली आहे.
ही स्पर्धा महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते १ या वेळात घेण्यात येईल.
प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख बक्षीसे तसेच पदक देण्यात येईल. इच्छुकांनी दिनांक 28 ऑगस्ट पूर्वी क्यू आर कोड किंवा नोंदणीची लिंक यापैकी कोणताही एक पर्याय वापरून नोंदणी करणे आवश्यक आहे.
जयतु संस्कृतम्! जयतु भारतम्!