Loading Events

प्रहार ब्रम्हास्त्राचा - पुस्तक वितरण समारंभ - Maharashtra Seva Sangh Mulund

  • Home
  • प्रहार ब्रम्हास्त्राचा – पुस्तक वितरण समारंभ
  • 12
  • 09

प्रहार ब्रम्हास्त्राचा – पुस्तक वितरण समारंभ

  • 06:00 PM - 08:00 PM
  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा

तीन चार दशकांपूर्वी भारताची व्यावसायिक राजधानी मुंबई ही गुन्हेगारी जगताचा निर्घृण हिंसाचार, खंडणीखोरी, गुन्हेगारी टोळयांच्यातील परस्पर भीषण संघर्ष, आणि अपहरणे अश्या भयावह कृत्त्यांनी त्रासलेली आणि ग्रासलेली होती. अशा वेळी एक नवीन कायदा आणला गेला जो जणू ब्रह्मास्त्रच ठरला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी. शिवानंदन यांनी स्वतः कथन केलेली ही मुंबईतील संघटित गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनाची चित्तथरारक, विस्मयजनक आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी!

मूळ इंग्रजीमध्ये लिहिलेल्या “Brahmastra Unleashed” ह्या अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या पुस्तकाचा ओघवता आणि रोचक असा मराठी अनुवाद निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शिरीष इनामदार यांनी “प्रहार ब्रह्मास्त्राचा” या शीर्षकाखाली केला आहे.

या मराठी आवृत्तीचे विमोचन शनिवार दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे होणार आहे. या कार्यक्रमात श्री. डी. शिवानंदन यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार असून त्यायोगे मुंबईतील संघटित गुन्हेगारीचा काळाकुट्ट इतिहास, तसेच मुंबई पोलिसांच्या दैदिप्यमान इतिहासाची कांही सोनेरी पाने उलगडली जाणार आहेत. तरी नक्की भेटूया, हा सनसनाटी इतिहास समजून घ्यायला.

Event Details

  • Date: September 12
  • Time: 6:00 pm - 8:00 pm
  • Event Category:

Organizer

  • Name: महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड
  • Website: View Organizer Website

Venue

  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड शाखा
  • Maharashtra Seva Sangh | Banquet Hall & Wedding Venue. Pandit Jawaharlal Nehru Rd, above Apna Bazaar, Indira Nagar, Mulund West,
    Mumbai, Maharashtra 400080 India
    + Google Map