इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com

प्रिय मैत्रिणींनो,
आपण सगळेच जण चातकासारखी पावसाची वाट पाहतोय.
टपटप करत थेंब यावेत, सरींवर सरी धो धो कोसळाव्यात आणि तहानलेल्या धरतीला नि पर्यायाने आपल्याला तृप्त कराव, चिंब करावं ही तृष्णा सगळ्यांनाच लागली आहे.
चला पावसाची संगीताच्या तालात आळवणी करूया,
बरसो रे… मेघा… बरसो – (पावसाची मराठी – हिंदी गाण्यांची मैफिल)
गायक कलाकार – जयमंगल वानखेडे, चंद्रकांत बडगुजर, कन्हुभाई परमार, रमेश अनभुले सोबत अरुणा हेगडे आणि श्रावणी चव्हाण.
तुम्हा सगळ्यांना ह्या संगीतमय पावसाच्या सुमधुर मैफिलीत चिंब भिजण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण!
कार्यक्रमाचा दिवस : शनिवार (चौथा) दि.२७/०६/२०२६
वेळ : ४ ते ६ (कार्यक्रम वेळेत सुरु होईल.)
स्थळ : महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड,ऐरोली शाखा, म.बा.देवधर संकुल,
प्लॉट नं. २४/२५, सेक्टर-१७, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८
मोबाईल : ७०३९९२७०४२ / ९००४३७१९४७
सर्व रसिक स्त्री – पुरुषांसाठी हा कार्यक्रम नि:शुल्क आहे.
आपले विनीत,
माधवी देशमुख – अध्यक्ष
दक्षता झगडे – कार्यवाह