इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com

१ एप्रिल २०२६ पासून नवीन प्राप्तिकर कायदा लागू झाला आहे. काय आहेत नव्या तरतुदी आणि त्याचा परिणाम सर्वसामान्य करदात्यांवर कसा होईल? काही अतिरिक्त कर भरावा लागेल का? नवीन फॉर्म्स कोणते आहेत? फॉर्म 15 H/G ऐवजी आता कोणता फॉर्म भरावा लागेल?
तसेच आर्थिक वर्ष २०२५- २६ चे विवरणपत्र सादर करताना १२ लाखाच्या आत उत्पन्न असेल तरी कोणाला कर भरावा लागेल? अजूनही जुनी करप्रणाली कोणाला फायदेशीर ठरेल? या वर्षीचे विवरणपत्र सादर करताना काय काळजी घ्यावी. वजावटी काढून टाकल्या असताना कर बचत गुंतवणूक चालू ठेवावी का? कसे करावे कर नियोजन?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणुन घेण्यासाठी आम्ही CA संजीव गोखले यांना आमंत्रित केले आहे.
श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा, ही विनंती.
विषय :- २०२५- २६ विवरण पत्र
वक्ते :- CA संजीव गोखले
दिनांक :- शुक्रवार, दि. १२ जून २०२६
वेळ : – सायं. ६.०० वाजता
कुठे : संस्थेचे सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह
दुसरा मजला, मुलुंड (प.)
प्रवेश विनामुल्य
