Loading Events

गप्पा कट्टा - Maharashtra Seva Sangh Mulund

  • Home
  • गप्पा कट्टा
  • 21
  • 08

गप्पा कट्टा

  • 06:30 PM - 08:30 PM
  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा

एक अभिनव उपक्रम – गप्पा कट्टा.
वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या कॉलनीत विविध विषयांना वाहिलेले असे कट्टे आपण अनेक ठिकाणी बघत असतो. आपला ग्रंथालय विभाग आपणा सर्वांसाठी एक अभिनव कट्टा घेऊन येत आहे
“गप्पा कट्टा”.

आपल्या कट्टयावर विषयाचे कुठलेही बंधन नसेल अर्थात राजकीय विषय सोडून. अगदी काल पेपरमध्ये आलेल्या बातमीपासून, एखादा नृत्य प्रकार, चित्रपट, काव्य, पुस्तक, आंतरराष्ट्रीय निबंध असल्या कुठल्याही विषयावर आपण गप्पा मारू शकतो.
जरी हा उपक्रम ग्रंथालय विभागातर्फे सुरु करण्यात आला असला तरी हा केवळ ग्रंथालयाच्या सभासदांपुरता मर्यादित नसून Gen अल्फा , Gen जी पासून वरिष्ठ नागरिकापर्यंत सर्वांसाठी खुला आहे.
तर चला जमूया गप्पा मारायला. आपला गप्पा कट्टा दर महिन्याच्या तिस-या शुक्रवारी भरेल. यातील पहिले पुष्प खालील प्रमाणे
शुक्रवार दिनांक २१ ऑगस्ट २०२६ वेळ सायंकाळी ६.३० वाजता
उद्घाटक : श्री. अरुण भंडारे

Event Details

  • Date: August 21
  • Time: 6:30 pm - 8:30 pm
  • Event Category:

Organizer

  • Name: महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड
  • Website: View Organizer Website

Venue

  • महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड ऐरोली शाखा
  • Maharashtra Seva Sangh Mulund Airoli Branch. AL-5/32, Mugalsan Rd, Sector 17,
    Airoli, Navi Mumbai, Maharashtra 400708 India
    + Google Map