इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com

२३ वे गिरिमित्र संमेलन
साहसाला सीमा नसते, पण हिमालयातील सियाचेन सारख्या अतिउंचीवरील युद्धभूमीवर घडलेलं साहस व शौर्य अतुलनीय आहे. सियाचेन हिमनदीमधील बर्फाच्छादीत खिंडी, शिखरे, चौक्या काबीज करण्यासाठी गिर्यारोहणाचे कौशल्य वापरून शत्रू आणि निसर्गाशी लढा देत गाजवलेला पराक्रम थक्क करणारा आहे. या मोहिमांचे नियोजन करणारे, सहभागी असणारे शूरवीर अधिकारी आणि सैनिक; पाहुणे लाभणे हे आपलं भाग्य आहे. सामान्य नागरिक आणि गिर्यारोहक म्हणून या वीरांना भेटण्याची, ऐकण्याची संधी गिरिमित्र संमेलनात मिळणार आहे.
विशेष अतिथी
लेफ्ट. जन. रमेश कुलकर्णी
PVSM, UYSM, AVSM
लेफ्ट. जन. संजय कुलकर्णी
PVSM, AVSM, SC, SM, VSM
नायब सूबेदार (ऑन कॅप्टन) बाणा सिंग
PVC
संमेलन तारीख
११-१२ जुलै २०२६
ठिकाण: महाराष्ट्र सेवा संघ
पं. जवाहरलाल नेहरू रस्ता,
मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०००८०.