इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com

नमस्कार मैत्रिणींनो,
वातावरणात ‘विठ्ठलाचा’ जयघोष निनादतो आहे. आपली मात्र संसाराच्या रहाटगाडग्यातून सुटका नाही. संसार, मुलबाळे, सणवार, अध्यात्म सगळ्यांचा मेळ तरी कसा घालणार? कुटुंबाला आधार देणाऱ्या आपण – ‘गृहलक्ष्मी’ पण घर आणि बाहेरील जगाचा मेळ घालताना त्रेधातिरपट होतोय ; म्हणूनच आपल्यासारख्या घरोघरींच्या रुक्मिणींना खास आमंत्रण.
संसार पंढरीची रुक्मिणी – (आजच्या स्त्रीची कर्तव्ये आणि त्याग)
– संवादक – ह.भ. प.- निलमताई पोतले – वडघुले.
सोबत
वारीचे रिंगण (निलमताईंच्या सुश्राव्य अभंगासह)
आपण सर्व स्त्री पुरुष भक्तांना वारीत सहभागी होण्यासाठी आग्रहाचे आमंत्रण !
कार्यक्रमाचा दिवस : शुक्रवार, दि. २४ / ०७ / २०२६
वेळ : ४ ते ६ (कार्यक्रम वेळेत सुरु होईल.)
स्थळ : महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड,ऐरोली शाखा, म.बा.देवधर संकुल,
प्लॉट नं. २४/२५, सेक्टर-१७, ऐरोली, नवी मुंबई-४००७०८
मोबाईल : ७०३९९२७०४२ / ९००४३७१९४७
टीप : प्रत्येकीने शक्यतो केसरी साडी घालावी.
आपले विनीत,
माधवी देशमुख – अध्यक्ष
दक्षता झगडे – कार्यवाह