इ-मेल:
mss_mulund@rediffmail.com
मैत्रेयी व सा. स. न. चिं. केळकर ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
“मला काय वाटतं ….” लेखन स्पर्धा – वर्ष सातवे
***विविध विषयांवरचे तुमचे विचार, तुमची मतं शब्दांकित करण्याची एक सुवर्णसंधी***
लेखन स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे :
१) नारायण सुर्वे व्यक्ती आणि साहित्य
२) आपल्या शिक्षण व्यवस्थेतून “शिक्षण” हरवले आहे का ?
३) फॅमिली डॉक्टर परत काळाची गरज
४) समाजातला वाढता हिंसाचार
५) डाएट सल्ला एक संभ्रमावस्था
६) आपली कुटुंबकेंद्री समाजाकडून व्यक्तीकेंद्री समाजाकडे वाटचाल
स्पर्धेसाठी नियमावली :
ही स्पर्धा सर्व वयोगटातील स्त्री -पुरुषांसाठी खुली आहे.
स्पर्धक दिलेल्या विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर लेख पाठवू शकतील.
लेखासाठी शब्दसंख्या मर्यादा किमान १००० व कमाल १५०० आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रु. १५०/- सहभाग शुल्क आकारण्यात येईल.
लेखाच्या शिरोभागी उजव्या कोपऱ्यात स्पर्धकाने आपले नाव, वय, पत्ता, ई- मेल व संपर्क क्रमांक लिहावा.
लेख इतरत्र छापून आलेला, कुठल्याही लिखाणाची नक्कल केलेला किंवा चॅट जी पी टी सारख्या कृत्रिम
बुद्धिमत्तेचा उपयोग करून लिहिलेला आढळून आल्यास तो स्पर्धेतून बाद करण्याचे सर्व हक्क आयोजक आणि
परीक्षक ह्यांच्या स्वाधीन असतील.
सुवाच्य अक्षरात लिहून स्कॅन केलेले किंवा युनिकोडमध्ये टाईप केलेले लेख pdf फाइल स्वरूपात महाराष्ट्र सेवा
संघ, मुलुंड या संस्थेच्या ई- मेलवर (mss.mazimaitreyee@gmail.com ) पाठवावेत किंवा लेखी प्रत संस्थेच्या
वरील पत्त्यावर पोस्टाने किंवा कुरियरने पाठवावी अथवा प्रत्यक्ष आणून द्यावी.
सहभाग शुल्क पाठविण्यासाठी :
Account Name : Maharashtra Seva Sangh, Mulund
Account No. 04070400000132
Name of the Bank : Bank of Baroda ( OD Account )
IFSC Code : BARB0MULUND ( 5 th Character is Zero )
सहभाग शुल्क भरल्यानंतर फी भरलेली पोचपावती फोटो/ स्क्रीनशॉट स्वरूपात 8879432328 या नंबरवर
What’s App केल्यानंतरच नोंदणी पूर्ण होईल.
स्पर्धेसाठी सहभाग शुल्कासहित लेख पाठविण्याचा अंतिम दिवस – शनिवार, दि. ०५ सप्टेंबर २०२६
स्पर्धेसाठी रोख पारितोषिके आहेत.
लेखांच्या निवडीबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील आणि तो स्पर्धकांना बंधनकारक असेल.